Best Tree Essay In Marathi – झाडाची आत्मकथा निबंध 2021

मी एक झाड बोलतोय ( Tree Essay In Marathi ) मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढविण्याचे महत्त्वाचे काम माझ्याकडे असेल. मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) निरनिराळे रंगीबिरंगी पक्षी माझ्याकडे आकर्षित होतील. मला लागलेली रंगी -बिरंगी फुले फळे हिरवी पाने पाहून सर्व पक्षी माझ्या आश्रयाला येतील.

Tree Essay In Marathi – झाडाची आत्मकथा निबंध

मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचे काम मी करेल. मी जर झाड झालो तर वन्य प्राणी पक्षी जसे माकड, खारुताई, सुतार पक्षी, पोपट माझ्या फाद्यांवर येऊन बसतील. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे कोणाला आवडत नाही . पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल. वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने, या साऱ्या आठवणीनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे. पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता कि, आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात.

नक्की वाचा – इंदिरा गांधी विषयी निबंध – Indira Gandhi Information In Marathi 2021

तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हाला हि भावना आहेत, आम्हाला हि वेदना होतात. तुमच्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की तुमच्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार हि येत नाही, एवढे स्वार्थी कसे झालात तुम्ही? झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो.

यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.  आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले, रानमेवा आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात.

तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहेत. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात.

अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही खूप झाडे तोडली आहेत, पर्यावरणाचा खूप ऱ्हास केला आहे. अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. आणखी एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही. आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल. आपल्या नंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी न लढता, पाणी आणि ऑक्सिजन साठी एकमेकांचा जीव घेईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारसा द्यायचा आहे का?

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

मी कोणामध्येही भेदभाव करत नाही. माझ्यासाठी पशू, पक्षी, मानव सारे एक सारखे आहेत. मी जात, धर्म, रंग असा भेदभाव करत नाही. मला सगळेच प्रिय आहेत. तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचावा. नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात, धर्म, रंग, राज्य, भाषा, देश यांचे काय कराल. वृक्ष सुद्धा तुमच्या सारखेच सजीव आहेत, त्यांचे संगोपन करा, काळजी घ्या.

नक्की वाचा – Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर…

माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकानी एक नाही चार चार झाडे लावा. वाढदिवसात, लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट म्हणून द्या. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. फक्त आपल्या जमिनीवरील नाही तर दुसऱ्याच्या झाडांनाही पाणी घाला. पशूंपासून त्यांची रक्षा करा. वणवा लावून देऊ नका. तुम्ही निसर्गाचा आदर करा, निसर्ग तुमचे संगोपन करेल. निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे. पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल, झाडे लावा झाडे जगवा.

माझ्या फांद्यांवर विविध पक्षी घरटे तयार करतील व त्यांच्या मध्ये त्यांची पिल्ले आणि पक्षी आपल्या पिल्लांना घास भरतांना हे सुंदर दृश्य मी झाड झाले तर मला पाहायला मिळेल. हृदयाला घाव घालणारी माय लेकराची नाते मला पहायला मिळेल. मी झाड झालो तर कोकिळा माझ्या हिरव्यागार पानांच्यामध्ये लपून गोड गोड गाणे गाईल आणि कोकीळ यांनी गायलेले सुंदर गाणे ऐकून मला खूप जवळून ऐकता येईल व अनुभवता येईल. मी झाड झालो तर निसर्गातील सुक्ष्म हालचाली मला जवळून पाहता येतील.

मानवाकडून होणार या वन्य प्राण्यांच्या हत्या एकमेव साक्षीदार मी असेल. माणूस असताना जी माझी धडपड होती. ती सर्व संपून जाईल कुठे प्रवासाला जाण्याची वेळ येणार नाही. सारखे सारखे घड्याळ पहावी लागणार नाही, स्वार्थी मित्र भेटणार नाहीत, पुन्हा कडून फसवणूक होण्याची भीती नसेल, आई-बाबांचे कटकट यापासून सुटका होईल. अभ्यासाचं टेन्शन नसेल, परीक्षेचे टेन्शन नसेल मी झाड झालो तर पक्ष्यांसारखे प्रामाणिक मित्र मला भेटतील.

त्यांच्या रोजच्या भटकंतीची चर्चा मला ऐकायला मिळेल मी झाड झालो तर उन्हाळ्यातील कडक ऊन मला अनुभवता येईल. सकाळच्या कोवळ्या उन्हात आनंद घेता येईल. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य मला पाहता येईल. आकाशात निर्माण होणारे सात रंगाचे इंद्रधनुष्य सर्वात प्रथम मला पाहता येईल. थंडीतील गारवा अनुभवता येईल. पावसाळ्यातील पावसामध्ये आंघोळ करता येईल. मी झाड झालो तर बाजूच्या झाड बांधवांची कत्तल पाहून मला खूप रडायला येईल.

मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) मला नेहमी माणसांची भीती असेल कारण माणूस माझे मित्र वन्यप्राणी पक्षी यांना माझ्यापासून दूर घेऊन जाईल. मी झाड झालो तर पर्यावरणाचे संतुलन टिकविण्याचा महत्त्वाचे काम करेल. पर्यावरणातील सजीवांना हानिकारक अशा विषारी वायूंचे शोषण करून सजीवांना चांगल्या आरोग्य प्रदान करण्याचे काम मी करेल. मी झाड झालो तर लहान मुले माझ्या फांद्यांना झोका बांधून घेऊन उंच उंच आभाळाला भिडणारे त्यांचा आनंद घेतील.

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) मधमाशा माझ्या त्यांना आपले घर बनवते आणि निरनिराळे रंगीबिरंगी फुलातील मध गोळा करून साठवता येईल. मी झाड झालो तर आकाशातील वीज वार्‍यांचा मारा सहन करून स्वतःला मजबूत बनवेल. मी झाड झालो तर दूरच्या प्रवासाला निघालेले प्रवासी माझ्या शीतल छायेत क्षणभर विश्रांती घेतील आणि भोजन करतील. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेले शाळेतील मुले माझ्या छायेत खेळतील बागडती नाचतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी मिळून एकत्र भोजन करतील. मी झाड झालो तर मनात फक्त एकच भीती असेल की एक दिवस मानव इतर वन्य प्राण्यांसाठी माझी सुद्धा हत्या करणार हे नक्की आहे.

मी मानवाला सांगू इच्छितो की, सर्वांनी मिळून कमीत कमी एक झाड तरी लावावे वते जगवावे. जेणेकरून तुमचेच पर्यावरण आणि स्वास्थ्य चांगले राहील. जास्तीत जास्त झाडे जगवन्यामुळे नियमित पाऊस येईल पावसामुळे तुमची शेती चांगली होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल. पर्यावरणामध्ये माझे महत्त्व आहे, तेवढेच इतर सर्व पशुपक्ष्यांचे देखील आहे आणि मीच नसेल तर हे पशु पक्षी आपले घरटे कुठे बांधतील.

कुठे राहतील किंवा मग तुम्हाला श्वषणासाठी लागणारा ऑक्सिजन कुठून मिळणार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व व्यक्तींनी किंवा मानव समाजाने झाडे जगविण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सर्वांना मी एक संदेश देतो कि सर्वांनी एक झाड तरी आपल्या दारी जगवावे. वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा.

“तुम्हाला आमचा लेख मी झाड झाले तर ( Tree Essay In Marathi ) कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi

' src=

By Rakesh More

Updated on: May 26, 2024

Essay on Importance of Trees in Marathi  हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi

झाडाचे महत्त्व वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Importance of Trees Essay in Marathi

Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.

  • झाडांना मानवी आयुष्यात खूप महत्त्व आहे.
  • त्यांच्याकडून आपणास ऑक्सिजन मिळते.
  • झाडे मानवी आयुष्यासाठी खूप उपयोगी आहेत.
  • त्यांच्यापासून अनेक औषधी बनविता येतात.
  • आपल्या घरातील लाकडी वस्तू त्यांच्यापासूनच बनवल्या जातात.
  • झाडाच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात.
  • झाड आणि वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात.
  • त्यांच्यापासून आपणास सुंगधी फुले मिळतात.
  • झाडे आपणास सावली देतात.
  • म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.

मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्न आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडे सूर्यप्रकाशातून उर्जा घेऊन हे अन्न तयार करतात.

तसेच काही झाडांपासून औषधी तयार केल्या जातात. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडापासून अनेक जीवनापयोगी वस्तू बनवल्या जातात. तसेच वह्या पुस्तकांसाठी लागणारा कागददेखील झाडांपासूनच बनतो. अशा प्रकारे झाडे ही मानवाला सर्व क्षेत्रात निस्वार्थपणे मदत करतात.

परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आणि मानवाच्याच जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे, आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.

मनुष्य आणि झाडे यांच्यात नेहमीच एक सखोल संबंध राहिला आहे. कारण हे नैसर्गिक घटक एकमेकावर अवलंबून आहेत. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायू ऑक्सीजनवरच मानव जिवंत राहू शकतो, तर मानवावासून मिळणाऱ्या कार्बनडाय-ऑक्साईड पासून आणि सूर्यप्रकाशापासून झाडांना त्यांच्या विविध  प्रक्रियांसाठी ऊर्जा मिळते.

झाडे फार परोपकारी आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य जगाच्या सेवेत व्यतीत होऊन जाते. झाडे आपल्याला थंड सावली देतात. आपल्याला त्यांच्याकडून फळे आणि फुले मिळतात. आपल्याला घर आणि फर्निचरसाठी लागणारे लाकूड झाडांकडूनच मिळते.

बऱ्याच झाडांची मुळे, देठ आणि पाने यांपासून औषधे बनवली जातात. झाडांमुळे वातावरणातील हवा शुद्ध राहते. झाडांमुळे वातावरणाचे चक्र संतुलित राहते आणि पाऊसही जास्त पडतो. झाडांची हिरवीगार पाने आणि रंगबेरंगी फुले वातावरणाला सुंदर बनवतात.

खरोखर, झाडे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. झाडांच्या सहवासात राहून माणूस निरोगी राहतो. आपले ऋषी-मुनी वनांमध्येच राहायचे. आपले प्राचीन गुरुकुल देखील वनांमध्येच असायचे. म्हणूनच भारतीय जीवन झाडे आणि वनस्पतींशी सखोलतेने जुळलेले आहे.

परंतु आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची  कापणी करत आहोत. यामुळे वने आणि जंगले नष्ट होत आहेत. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे. पाण्याअभावी बर्‍याचदा आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे, त्यात असंख्य लोकांचे प्राण जात आहेत. तर प्रदूषणामुळे वातावरण दुषित होत आहे, लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

पृथ्वीतलावावर जीवन शक्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग. कारण पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे झाडे आणि वनस्पती आहेत. आपण झाडांना देवाचेच रूप मानले पाहिजे, त्यांच्यामुळेच येथे सर्व जीवांचे जीवन शक्य झाले आहे.

झाडांना आपण हिरवे सोने देखील म्हणतात, कारण संपूर्ण पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींशी झाडांची तुलना केली जाऊ शकत नाही, झाडे आपल्याला अतिशय मौल्यवान गोष्टी प्रदान करतात. झाडांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्राप्त होतो. याशिवाय हिरव्या भाज्या, फळे इत्यादी जीवनावश्यक गोष्टी आपल्याला झाडांपासूनच मिळतात. निसर्गाने केलेल्या या परोपकाराची आपल्याला कधीच परतफेड करता येणार नाही.

मानवजातीच्या विकासात निसर्गाचा मोठा वाटा आहे. प्राचीन काळातील पाषाण युगापासून आजच्या नवीन युगापर्यंत, प्रत्येक प्राणी झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून राहून जीवन जगत आला आहे. झाडांपासून इतर बऱ्याच मौल्यवान वस्तू बनतात, तुळस, आवळा, कडुनिंब अशी अनेक झाडे औषधे म्हणून वापरली जातात. पृथ्वीवर पावसाचे मुख्य कारण म्हणजे झाडे, ज्यामुळे शेती व इतर घरगुती कामांसाठी पाणी उपलब्ध होते. झाडांमुळे वातावरणातील संतुलन कायम राहते. झाडे आणि वनस्पती पृथ्वीवर सर्वात शुद्ध वातावरण तयार करतात. झाडांमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमि प्रदूषण कमी होते.

झाडांपासून मिळणारे लाकूड घरे, फर्निचर, खेळणी, सजावटीसाठी फर्निचर इत्यादींसाठी वापरले जाते. कोणत्याही देशाच्या विकासात शिक्षणाला एक महत्त्वाचे स्थान असते, परंतु अभ्यासासाठी जी पुस्तके वापरली जातात त्यांना लागणारा कागददेखील झाडांपासूनच तयार केला जातो.

निसर्गाने मानवांना बरेच काही दिले आहे, परंतु त्यानंतरही माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करतो. जंगले नष्ट करून माणूस तेथे इमारती उभ्या करतोय. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाने नवीन उद्योग तयार होत आहेत, उद्योग बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे झाडे तोडली जात आहेत आणि मोठ्या उद्योगांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळेही निसर्गाचे नुकसान होत आहे.

सुपीक जमीनीवर झाडांची लागवड न केल्याने त्या जमिनीचे वाळवंटात रुपांतर होत आहे. दररोज झाडे तोडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि हवामान, नैसर्गिक आपत्ती इत्यादींच्या अनिश्चिततेचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत आहे. पूर, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, उपासमार इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे आणि झाडे नष्ट झाल्याने मानवासोबत वन्यजीवांचेही जीव धोक्यात आले आहेत.

वृक्ष ही पृथ्वीची एक मौल्यवान मालमत्ता आहे, म्हणूनच सरकारने तिच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले पाहिजेत. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरुन पृथ्वीचे हिरवे सौंदर्य टिकेल.

झाडे आपल्याला अनेक मौलिक वस्तू तर देतातच, पण झाडांकडून आपण अजून एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे ‘सर्वांशी समान वागणूक’. म्हणून माणूस जसा आपल्या मुलाबाळांशी वागतो, तसेच त्याने झाडांशीही वागले पाहिजे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘एक तरी झाड जगवा!’ या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तरच ही वसुधा पुन्हा ‘हरीतश्यामल’ बनेल.

झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

झाडे ही मानवाचे मित्र आहेत. झाडे मानवाच्या आयुष्यात अनेक भौतिक समस्यांमध्ये सहाय्य करतात. आपल्या प्राचीन ग्रंथांनी आणि आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झाडांचे महत्व आपल्याला पटवून दिले आहे. आपले धर्मग्रंथ तर वृक्षांना देवासमान समजतात. गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे’. पिंपळाच्या खाली बसूनच भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले होते.

आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की सर्वात अधिक प्राणवायू आपल्याला पिंपळाच्या झाडापासूनच मिळतो. तुळशीच्या मूळरुपात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. तुळशीची पाने, बियाणे सर्व रोगोपचारांमध्ये उपयोगी आहेत. हेच कारण आहे की, तुळशीचे रोप आज प्रत्येक भारतीय घरात पाहायला मिळते. तसेच अशोकाच्या पानांपासूनही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी बनवल्या जातात.

लिंबाच्या झाडाबद्दल तर काय बोलावे? याची उपयोगिता अवर्णनीय आहे. लिंबाचा रस, पाने, बियाणे सर्वच उपयोगी आहे. लिंबाचे खरंच मानवाला खूप फायदे आहेत म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वरोग हरो निम्बः’. मानवांना जवळजवळ सर्व वन संपत्तीचा फायदा होतो. फळे देणारी वृक्षे तर माणसासाठी वरदानच आहे. शाकाहारी भोजन फळांशिवाय असंतुलित मानले जाते. आंबे, द्राक्षे, पपई, केळी अशा सर्वच फळांचा गोडवा आणि पौष्टिकता तर सर्वांना माहितच आहे.

झाडांमुळे चांगला पाऊस पडतो, भूरक्षण होते आणि वायू प्रदूषण कमी होते. एवढेच नाही, लाख आणि रेशीमचे कीटक झाडांवर भरभराट करतात. कागद पाइन आणि बांबूपासून बनविला जातो. याशिवाय इमारत बांधकाम आणि फर्निचर इ. मध्ये लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे लाकडाची उपयुक्तता तर सर्वज्ञात आहे. अशा प्रकारे, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झाडे त्याची सोबती असतात. झाडे आपल्याला नैतिकता आणि परोपकाराचा संदेश देखील देतात.

आजचे भौतिकवादी मानव आपल्या सुख-सुविधेसाठी झाडांची अंदाधुंद कापणी करीत आहे. यामुळे पृथ्वीवरील वन क्षेत्राची टक्केवारी कमी होत आहे आकडेवारीवरून असे दिसून येते की पर्यावरणीय समतोलतेसाठी पृथ्वीवरील भूभागाच्या 33 टक्के वन असणे आवश्यक आहे. झाडांची कापणी, मानवी लोकसंख्येत वाढ, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर आणि आण्विक चाचण्या आपले वातावरण दूषित करत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सर्वात धोकादायक गोष्ट तर अशी आहे की ओझोनच्या थराचे सतत ऱ्हास होत आहे.

या संकटापासून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हाच आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मानवाला आपल्या जीवनातील झाडांचे महत्व कळत नाही आहे. वृक्षांची लागवड करणाऱ्या लोकांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या पवित्र कार्यात त्यांना आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. वृक्षारोपणाच्या कार्याचा वीस सूत्री कार्यक्रमात समावेश केला पाहिजे. जनतेच्या पाठबळाद्वारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ध्येय असले पाहिजे. तेव्हाच ‘झाडे लावा देश वाचवा’ ची घोषणा प्रत्यक्षात साध्य होऊ शकेल शकेल.

अशा प्रकारे मानवी जीवनात झाडांचे महत्व अतुलनीय आहे, झाडांशिवाय आपण मानवी जीवनाची आणि निसर्गाची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या निसर्गाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करून वृक्षारोपण केले पाहिजे.

तर मित्रांनो झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.

' src=

Rakesh More

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषणं, चांगले विचार, आणि गोष्टी वाचायला मिळतील. तुम्हालाही काही लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Related Post

easy tree essay in marathi

जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi

easy tree essay in marathi

पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi

Latest posts.

माझे शेजारी मराठी निबंध Essay on My Neighbour in Marathi

माझे स्वप्न मराठी निबंध Essay on My Dream in Marathi

माझे घर मराठी निबंध Essay on My House in Marathi

माझी बहिण मराठी निबंध Essay on My Sister in Marathi

माझा भाऊ मराठी निबंध Essay on My Brother in Marathi

माझे आजोबा मराठी निबंध Essay on My Grandfather in Marathi

favicon

inmarathi.me is blog for essay and speech on various topics like festivals, nature, people and general categories.

Quick Links